नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: March 18, 2016 02:16 IST2016-03-18T02:16:48+5:302016-03-18T02:16:48+5:30

तेल्हारा तालुक्यातील घटना.

The farmer's suicide in a tainted napki | नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

हिवरखेड (अकोला): सततच्या नापिकीला कंटाळून आकोली शेतशिवारातील स्वमालकीच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या आकोली रुपराव येथील कैलास देवीदास भोंडे (३७) या शेतकर्‍याने आत्महत्या केली. गुरुवार, १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृताचा भाऊ विलास भोंडे हा सकाळी शेतात गेला असता, शेतातील बाभळीच्या झाडाला कैलासने गळफास घेतल्याचे दिसून आले. मृताकडे दीड एकर शेती होती. त्याच्या पश्‍चात मुलगा, मुलगी व पत्नी असा आप्त परिवार आहे. संतोष बाजोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: The farmer's suicide in a tainted napki