बेलखेड येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 06:21 PM2018-03-23T18:21:19+5:302018-03-23T18:21:19+5:30

तेल्हारा : तालुक्यातील बेलखेड येथील युवा शेतकरी गणेश श्रीकृष्ण माळोकार वय २२ याने हरभरा सोगणि अर्धवट सोडून घरी येवून गळफास घेतल्याची घटना दि. २३ मार्च ला सकाळी १० वाजता घडली.

Farmer's son suicides in Belkhed | बेलखेड येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या

बेलखेड येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे गणेश श्रीकृष्ण माळोकारकडे वडिलोपार्जित २ एकर शेत व लागवण चे केलेल्या शेतात खरीपात कपाशी पिक झाले नाही. शेतातून परत येताच सदर युवकाने आपल्या राहत्या घरी घळफास घेवून आत्महत्या केली.

तेल्हारा : तालुक्यातील बेलखेड येथील युवा शेतकरी गणेश श्रीकृष्ण माळोकार वय २२ याने हरभरा सोगणि अर्धवट सोडून घरी येवून गळफास घेतल्याची घटना दि. २३ मार्च ला सकाळी १० वाजता घडली. हिवरखेड पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. 

        बेलखेड येथील गणेश श्रीकृष्ण माळोकार वय २२  ह्या युवकाकडे वडिलोपार्जित २ एकर शेत व लागवण चे केलेल्या शेतात खरीपात कपाशी पिक झाले नाही. त्यानंतर रब्बी हंगामात हरभरा पिकाचे उत्पादन दिसत नसल्याने हरभरा सोगणी करून शेतातून परत येताच सदर युवकाने आपल्या राहत्या घरी घळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहीती हिवरखेड पोलिसांना दिली त्यावरून बिट जमादार राजु इंगळे यांनी  घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. गणेश हा मनमिळाऊ स्वभावाचा एकुलता एक मुलगा होता. तेल्हारा वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला.

Web Title: Farmer's son suicides in Belkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.