वाडेगाव येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:45 IST2017-09-28T19:41:19+5:302017-09-28T19:45:45+5:30
वाडेगाव : येथील झोपटपट्टीमधील अजय पंजाबराव डोंगरे (२१) या युवकाने २८ सप्टेंबर रोजी सकाळी गावातील शेतकरी शहा यांच्या शेताजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाडेगाव येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या
ठळक मुद्देकडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या बाळापूर पोलीसांनी केला पंचनामाआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : येथील झोपटपट्टीमधील अजय पंजाबराव डोंगरे (२१) या युवकाने २८ सप्टेंबर रोजी सकाळी गावातील शेतकरी शहा यांच्या शेताजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची बाळापूर पोलीस स्टेशनला माहिती होताच ठाणेदार एफ. सी. मिर्झा यांचा मार्गदर्शनात वाडेगाव चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल संजय वाघ, प्रफुल्ल पवार यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून, आत्मह त्येचे कारण समजू शकले नाही.