मोरगाव भाकरे येथील शेतकऱ्याची निर्घुण हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:52 IST2020-02-16T16:52:20+5:302020-02-16T16:52:38+5:30
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने शेतकºयाचे प्रेत जाळण्याचा प्रयन करण्यात आला.

मोरगाव भाकरे येथील शेतकऱ्याची निर्घुण हत्या!
निंबा फाटा (अकोला) : उरळ पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या मोरगाव भाकरे येथील ५५ वर्षीय शेतकºयाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली.हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने शेतकºयाचे प्रेत जाळण्याचा प्रयन करण्यात आला. शिवनाथ गोरकनाथ भोयटे असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी एका संशयीतास ताब्यात घेउन चौकशी सुरू केली आहे.
मोरगाव भाकरे येथील शिवनाथ भोयटे यांची यांची बाखराबाद शिवारात सहा एकर शेती आहे. शनिवारी रात्री हरभरा पिकाचे वण्य प्राण्यांकडून संरक्षण करण्यासाठी ते शेतात गेले होते. रविवारी ते घरी न परत आल्याने त्यांच्या पत्नीने शेत गाठले. शेतात असलेल्या मचाणावर त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच बाळापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहीणी साळुंखे, उरळचे ठाणेदार संजीव राउत, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आदींनी भेट दिली. घटनास्थळावर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. उरळ पोलिसांनी या प्र्रकरणी एका संशयीतास ताब्यात घेउन चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी निवृत्ती शिवनाथ भोयटे यांच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.