शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम प.बंगालच्या बँकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 04:56 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी पीक विमा काढलेल्या बहुतांश शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अकोट तालुक्यासह अन्य काही ठिकाणच्या शेतक-यांची पीक विम्याची रक्कम चक्क पश्चिम बंगालमधील स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

- संतोष येलकर अकोला - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी पीक विमा काढलेल्या बहुतांश शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आलीआहे. मात्र, जिल्ह्यातील अकोट तालुक्यासह अन्य काही ठिकाणच्या शेतक-यांची पीक विम्याची रक्कम चक्क पश्चिम बंगालमधील स्टेटको-आॅपरेटिव्ह बँकेच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात शेतक-यांनी मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचा विमा काढला होता. विमा हप्त्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करून नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचा विमा काढण्यात आला. संबंधित शेतक-यांना विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. नॅशनल इन्श्युरन्स कंपनीमार्फत जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांना पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. मात्र, काही शेतकºयांना अद्यापही पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नाही. ९ आॅगस्ट रोजी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अकोट येथील शाखेत विम्याची रक्कम मंजूर झाली. मात्र, अद्याप खात्यात जमा झालेली नाही, अशी तक्रार तेल्हारा तालुक्यातील शिरसोली येथील शेतकरी तथा माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह अनेक शेतकºयांनी नॅशनल इन्श्युरन्सकंपनीच्या मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक कार्यालयातही केली.तसेच या संदर्भात खोटरे, यांच्यासह नारायणराव गव्हाणकर, डॉ. जगन्नाथ ढोणे व डॉ. अशोक ओळंबे यांनी ७ आॅगस्ट रोजी मुंबई येथीलनॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा केली असता, अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतक-यांच्या पीक विम्याची रक्कम पश्चिम बंगालमधील स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या लोहापूर शाखेत वळती करण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अकोट येथील शाखेतून मी पीक विमा काढला. विमा मंजूर झाला असून, यादीत नावेही आहेत; मात्र माझ्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. ही रक्कम पश्चिम बंगालमधील बँकेत जमा करण्यात आली आहे.- वसंतराव खोटरे, माजी आमदार तथा शेतकरी (शिरसोली, जिल्हा अकोला)चौकशीचे आश्वासन : खोटरे यांनी या प्रकरणी १६ आॅगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत तक्रार केली. या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्रbankबँक