कृषिमंत्र्यांनी खरेदी केला शेतमाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 02:15 IST2017-01-29T02:15:24+5:302017-01-29T02:15:24+5:30
कृषी प्रदर्शनाला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कृषिमंत्र्यांनी खरेदी केला शेतमाल!
अकोला, दि. २८- शेतकर्यांनी कृषी प्रदर्शनात आणलेला दज्रेदार शेतमाल बघून राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी हा शेतमाल खरेदी केला. यामागे शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उद्देश होता. कृषिमंत्र्यांनी शेतकर्यांची यावेळी विचारपूस केली.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार एकर जागेवर राज्यस्तरीय वसंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचा शनिवारी दुसरा दिवस होता. या प्रदर्शनाला राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि खासदार संजय धोत्रे यांनी भेट दिली. याप्रसंगी बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री वसंतराव धोत्रे व बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नीळकंठ खेडकर, संचालक प्रकाशकाळे, राजेश बेले, बाबूराव गावंडे, ज्ञानेश्वर महल्ले, विठ्ठलराव चतरकर, देवेंद्र देवर, अभिमन्यू वक्टे, सुनील परनाटे, प्रमोद लाखे, संदीप पळसपगार, चंद्रशेखर खेडकर, रमेशचंद्र चांडक, चंदू चौधरी, सुरेश सोळंके, अभय थोरात, जयंत मसने, रविकांत राऊत, डिगांबर गावंडे, विद्या गावंडे, मंदाकिनी फुंडकर, अर्चना मुरू मकार, वर्षा गावंडे, प्रतिभा अवचार आदींसह उद्योजक बसंत बाछुका, बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार आदींची उपस्थिती होती.
कृषिमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनातील बहुतांश दालनाला भेट दिली. शेतकर्यांनी त्यांच्या शेतात तयार केलेली काकडी, सिसा-मासा येथे शेतकरी फाले यांनी शेतात काढलेला भुईमूग आदीसह कॅशलेस व्यवहार शेतकर्यांना समजावून सांगणार्या दालनालाही त्यांनी भेट दिली. ग्रीन आर्मी सेंटर, विजय शेगोकार यांची हळद व इतर अवजारे, बचत गटाने प्रक्रिया करू न केलेला शेतमाल त्यांनी बघितला. बचत गट, शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी कृषिमंत्र्यांनी त्यांचा शेतमाल विकत घेतला. याप्रसंगी शेतकर्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले, त्यांनी त्यांचे उत्तर देऊन समाधान केले.
शेतकर्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी यांनी शेतकर्यांना सेंद्रिय शेती व कृषी विद्या या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्यांच्या शंकांचे निरसन केले. इतर खासगी कंपन्यांच्या संचालकांनी शेतकर्यांना मार्गर्शन केले.