अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले १३९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:35 IST2020-03-01T14:35:30+5:302020-03-01T14:35:42+5:30
अकोला : जिल्ह्यातील शेतकºयांना अखेर यावर्षीच्या पंतप्रधान पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली असून, १३९ कोटी ३३ लाख ११ हजार ...

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले १३९ कोटी
अकोला: जिल्ह्यातील शेतकºयांना अखेर यावर्षीच्या पंतप्रधान पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली असून, १३९ कोटी ३३ लाख ११ हजार ७९७ रुपये शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाले. ज्वारी, सोयाबीन या पिकांची ही रक्कम आहे. तूर व कापूस पिकाची रक्कम मात्र अद्याप मिळाली नाही. इतरही योजनांमधील ६१३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
पंतप्रधान पीक विमा योजनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २,६८,५२६ शेतकºयांनी सहभाग घेत २ लाख ४३ हजार ९ हेक्टरसाठी १७, कोटी ४ लाख ४२ हजार रुपयांचा पीक विमा काढला होता. सोयाबीन व ज्वारी पिकांची नुकसान भरपाई असून, ज्वारीची ४९० तर सोयाबीनची प्रति हेक्टरी ८६० रुपये संरक्षित रक्कम शेतकºयांना भरावी लागली होती. सर्वाधिक अकोला तालुक्यातील शेतकºयांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
इतर नुकसान भरपाई
दरम्यान, गतवर्षीच्या पीक विम्यासह २०१९-२० वर्षातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या पिकांचे ३१५ कोटी, २०१८-१९ मधील हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतील अंंबिया व मृग बहराचे ११० कोटी, १८-१९ मधील रब्बी हंगामातील ११३ कोटी, १९-२० वर्षातील अंबिया बहराचे ५२ कोटी, तसेच २०१७-१८ मधील आॅफलाइन विम्याचे १० कोटी ३७ लाख मिळून ७३९.३३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. उर्वरित कापूस, तूर, मूग व उडीद पिकांची रक्कम शिल्लक आहे.