वाशिम जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: December 25, 2014 23:38 IST2014-12-25T23:38:51+5:302014-12-25T23:38:51+5:30

मालेगाव तालुक्यातील रेगाव येथील घटना; नापिकी व कर्जबाजारीपणा कारणीभूत.

The farmer suicides in Washim district | वाशिम जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

वाशिम जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव तालुक्यातील रेगाव येथील एका तरूण शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २५ डिसेंबरच्या सकाळी उघडकीस आली.
मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रेगाव येथील शेतकरी संजय हरीभाऊ डाखोरे (३५) यांनी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गावातीलच धर्मा पवार यांच्या शेतातील सागाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. उपवर मुलीच्या लग्नाची चिंता आणि सततच्या नापिकीमुळे डोक्यावरील कर्ज यामुळे संजय डाखोरे यांनी मृत्यूला जवळ केल्याचे मृतकाच्या भावाने पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

Web Title: The farmer suicides in Washim district