वणी-वारुळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 15:01 IST2019-02-12T15:01:11+5:302019-02-12T15:01:35+5:30
वणी वारूळा ( अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोट तालुक्यातील वणी-वारुळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, ८ फेब्रूवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान दर्यापूर येथील खासगी इस्पितळात सोमवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

वणी-वारुळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
वणी वारूळा ( अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोट तालुक्यातील वणी-वारुळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, ८ फेब्रूवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान दर्यापूर येथील खासगी इस्पितळात सोमवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
वारूळा येथील शेतकरी दादाराव नारायणराव वक्टे वय (५५) याच्या कडे वारूळा शेत शिवारात २ एकर शेती असुन, त्या शेतीवर सेवा सहकारी सोसायटीचे ५० हजार रुपये कर्ज आहे. नापिकीमुळे व घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कंटाळलेल्या दादाराव वक्टे यांनी शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी दादाराव यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आकोट येथील डॉक्टरानी पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला. घरच्या मंडळींनी त्यांना दयार्पूर येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे उपचारादरम्यान ११ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगी, मुलगा, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.