कर्जाला कंटाळून आस्टूल येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:30 IST2019-07-21T17:30:13+5:302019-07-21T17:30:16+5:30
खानापूर (अकोला): दुष्काळी स्थिती, नापीकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून आस्टूल येथील ६५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली.

कर्जाला कंटाळून आस्टूल येथील शेतकऱ्याची आत्महत्या
खानापूर (अकोला): दुष्काळी स्थिती, नापीकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून आस्टूल येथील ६५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना २१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. गिरधर चंद्रभान जामकर असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
आस्टूल येथील गिरधर जामकर यांच्याकडे तीन एक कोरडवाहू शेती आहे. सदर शेतीवर त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अल्प उत्पन्न होत आहे. त्यातच यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी स्वत:च्या शेतात २० जुलै रोजी गळफास घेउन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पातूरचे एएसआय दिनकर गुडदे, हेकॉ संतोष शेखरकार, पोकॉ राजेश वाकोडे यांनी घटनास्थळावर भेट देउन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय अकेला येथे पाठविला. जामकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड व आप्त परिवार आहे.