शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळावा!

By admin | Updated: March 3, 2015 23:44 IST

कृषी अर्थशास्त्र परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे यांच्याशी बातचित.

राजरत्न सिरसाट/अकोला : आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असेल, तर शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाची कास धरलीच पाहिजे; त्याच वेळी त्यांच्याकडील शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे गरजेचे आहे. यांसह कृषी निविष्ठांचा खर्च कमी करणे या महत्त्वाच्या विषयावर १७ व्या कृषी अर्थशास्त्र परिषदेत देशातील कृषी अर्थशास्त्रज्ञांनी मंथन केले. या संबधीचा ठराव या परिषदेत पारित करण्यात आला असूून, लवकरच तो शासनाला पाठवणार असल्याची माहिती परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे (पुणे) यांनी दिली. अमरावती येथे १ व २ मार्चला राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषद पार पडली. ती आटोपून परतत असताना अकोला येथे डॉ. महेंद्रे यांनी परिषद घेण्यामागील भूमिका ह्यलोकमतह्णशी बातचित करताना मांडली.प्रश्न - कृषी अर्थशास्त्र परिषद घेण्यामागील उद्देश काय?- शेतकर्‍यांना शेती परवडेल, यासाठीचा ताळेबंद तयार करणे, कमी खर्चाच्या शेतीकरिता मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश या परिषदेचा आहे. युवा कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि युवा शेतकर्‍यांना कृषी अर्थशास्त्र विषयाचे आकलन व्हावे, हाही उद्देश आहे.प्रश्न - या परिषदेला किती शास्त्रज्ञ उपस्थित होते?- देशातील १४२ हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. या सर्व कृषी शास्त्रज्ञांनी कृषी अर्थशास्त्राशी निगडित शोधनिबंध सादर केले.प्रश्न - कोणते विषय महत्त्वाचे वाटले?-शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावे हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे. या विषयावर या परिषदेत महत्त्वाची चर्चा झाली. शेतकर्‍यांचा उत्पादनखर्च कमी झाला पाहिजे. बियाणे, खते, कीटकनाशके यावर २२ टक्के खर्च कमी करता येतो. त्यावर मंथन झाले. प्रश्न- खेडी ओस पडत आहेत. मजूर मिळत नाहीत. यासंबधी विचार झाला का?- हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावर परिषदेत महत्त्वाचे शोधनिबंध तज्ज्ञांनी सादर केले. खेड्यातून मोठय़ा प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत असून, शहरीकरण वेगाने होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कृषिक्षेत्र घटत आहे. त्याचा फटका भविष्यात बसण्याची शक्यता असल्याने खेड्यात प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील. खेडी स्वयंपूर्ण करावी लागणार आहेत. याकरिता कृषी उद्योग व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. या विषयावर परिषदेत चर्चा होऊन ठराव घेण्यात आले.प्रश्न - शहरात शेती करता येईल का ? - होय. टेरेस गार्डन, किचन गार्डनिंग या संकल्पना पुढे आल्या आहेत. अनेकांनी या पद्धतीने भाजीपाला, फळपिके घेण्यास सुरुवात केली आहे. याला व्यापक स्वरू प प्राप्त व्हावे, यासाठी परिषदेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी शास्त्रज्ञांनी कृषीशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयावर उत्कृष्ट शोधनिबंध सादर केले. त्यांचा परिषदेत स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला.