शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 1:20 PM

अकोला शहरातील गांधी-जवाहर बाग येथून शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यात यावा, यासह शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीअकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले.पीक नुकसान भरपाईपोटी एकरी १० हजार रुपयांची मदत तातडीने शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावी, शेतकºयांचा सात-बारा कोरा करून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकरी पाल्य विद्यार्थ्यांना सवलती लागू करण्यात याव्या, शेतकरी व शेतमजुरांना सरसकट कर्जमाफी व दुष्काळाच्या उपाययोजना लागू करण्यात याव्या, शेतमजुरांना बिनव्याजी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, शेतकºयांच्या शेतमालाची प्रतवारी न करता हमीदराने खरेदी करण्यात यावी, ई-क्लास अतिक्रमित जमिनी नियमानुकूल करण्यात याव्या व शेतकरी-शेतमजुरांना सहा महिने मोफत रेशन पुरविण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला शहरातील गांधी-जवाहर बाग येथून शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना देण्यात आले.या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अरुंधती सिरसाट, माजी आमदार बळीराम सिरस्कार, डी. एन. खंडारे, रमेश भोजने, पुष्पा इंगळे, दामोदर जगताप, बालमुकुंद भिरड, बळीराम चिकटे, प्रभा सिरसाट, शोभा शेळके, प्रदीप वानखडे, सागर कढोणे, आकाश सिरसाट, मदन भरगड, प्रतिभा अवचार, अ‍ॅड. संतोष रहाटे, गजानन गवई, मनोहर पंजवानी, सुरेश पाटकर, किरण बोराखडे, अ‍ॅड. धनश्री देव, बबलू जगताप, काशीराम साबळे, संध्या वाघोडे, शरद गवई, प्रा. संतोष हुशे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, सचिन शिराळे, विकास सदांशिव, सम्राट सुरवाडे, अशोक सिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, सुरेश सिरसाट, पराग गवई, डॉ. सुनील जाधव, ज्ञानेश्वर सुलताने, विद्या अंभोरे, रंजना गेडाम, योगीता वानखडे, सुनीता वानखडे, कविता राठोड, सुषमा कावरे, प्रा. मंतोष मोहोड, सुनीता हिवराळे, अनुराधा ठाकरे, संगीता खंडारे, मंगला सिरसाट, सम्राट तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी