शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:30 PM

अकोट (जि. अकोला) : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवार, ३० मार्च रोजी घडली.

अकोट (जि. अकोला) : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवार, ३० मार्च रोजी घडली. लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (५२ वर्षे) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून, जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे व नात पुजा सुकोसे (२ वर्षे) हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहा वाजताचे सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवन करण्यासाठी बसले. जेवन सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले. चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबियांवर हल्ला चढविला. हा हल्ला एवढा जबर होता की, सर्व जण गंभीर जखमी झाले. मधमाशांचा दंश असह्य झालेले सुकोसे कुटंबियांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला; परंतु मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. यावेळी सुुनिल वर्तने हे सुकोसे कुटुंबियांच्या मदतीला धावले. जखमी झालेल्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान लक्ष्मण सुकोसे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या संतोष, रेखाबाई व पुजा यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटFarmerशेतकरी