विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:09 IST2019-10-14T13:08:53+5:302019-10-14T13:09:12+5:30
दामोदर सीताराम पवार (६३) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंजर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महागाव मारखेड येथे शेतात गेलेल्या शेतकºयाचा विजेचा शॉक लागून घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना १३ आॅक्टोबर रोजी सकाळी घडली. दामोदर सीताराम पवार (६३) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील महागाव मारखेड येथील दामोदर पवार हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.