अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; टाकळी खुरेशी येथील घटना

By रवी दामोदर | Updated: September 21, 2023 18:25 IST2023-09-21T18:04:16+5:302023-09-21T18:25:52+5:30

बाळापुर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथील घटना

Farmer dies due to lightning; Incident at Takli Khureshi | अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; टाकळी खुरेशी येथील घटना

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; टाकळी खुरेशी येथील घटना

रवी दामोदर 

अकोला: बाळापुर तालुक्यातील टाकळी खूरेशी येथे अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. पद्माकर आत्माराम घोगरे (५८) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.   

जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. टाकळी खुरेशी येथील पद्माकर घोगरे हे शेतात गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात होताच त्यांनी झाडाचा आडोसा घेतला. अचानक वीज कोसळल्याने पद्माकर घोगरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी कोतवाल भूषण दांदळे उपस्थित होते.

Web Title: Farmer dies due to lightning; Incident at Takli Khureshi