अंदुरा येथे फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:31 IST2019-08-24T13:31:23+5:302019-08-24T13:31:31+5:30
शेतात किटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २४ आॅगस्ट रोजी बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे घडली.

अंदुरा येथे फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अंदुरा (अकोला) : शेतात किटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २४ आॅगस्ट रोजी बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे घडली. गजानन जाणूजी इंगळे (४८) असे विषबाधेने मृत्यूमुखी पडलेल्या शेतकºयाचे नाव आहे.
पावसाने उघडीप दिल्याने अंदुरा परिसरात सध्या पिकांवर किटकनाशक फवारणीचे काम जोरात सुरु आहे. गजानन जाणूजी इंगळे हे गत दोन ते तीन दिवसांपासून आपल्या शेतात फवारणी करीत होते. शुक्रवार, २३ आॅगस्ट रोजी दुपारी शेतात फवारणी करती असताना त्यांना किटकनाशकाची बाधा झाली. विषबाधा झाल्याची लक्षणे दिसताच कुटुंबियांनी त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. गजानन इंगळे यांच्या पश्चात पत्नी, ४ मुली, १ मुलगा असा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने पूर्ण गावत शोककळा पसरली आहे.