मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:52 IST2020-04-06T17:52:37+5:302020-04-06T17:52:43+5:30
मोर्णा नदीकाठच्या शेतात शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान रविवारी काम करीत होते

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; एक जखमी
हातरुण (जि. अकोला) : शेतात काम करीत असताना अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकºयाचा मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. जखमी युवकावर उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अंदुरा शेतशिवारातील मोर्णा नदीकाठच्या शेतात शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान रविवारी काम करीत होते. त्याच वेळी मोर्णा नदी पात्रात असलेले मधमाश्यांचे मोहोळ उठले. अचानक पाठीमागून आलेल्या मधमाश्यांनी शेतकºयास चावा घेण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात असलेल्या मधमाश्यांनी घेरल्याने घाबरलेल्या शेतकºयाने बचावाचा प्रयत्न केला; मात्र या मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान गंभीर जखमी झाले. मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शेतकरी तवक्कल खान यांना इस्ताक खान, सत्तार खान आणि इशरत खान यांनी तातडीने अकोला येथील सर्वोपचार दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले; मात्र शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान (वय ८०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इस्माईल खान माजिद खान (वय २७) हा युवक जखमी झाला आहे.