विहिरीत उडी घेऊन शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST2020-12-05T04:29:58+5:302020-12-05T04:29:58+5:30

महेंद्र तायडे हे नेहमीप्रमाणे ३ डिसेंबर रोजी गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळपर्यंत ते परत आले नसल्याने त्यांचा शोध ...

Farmer commits suicide by jumping into a well | विहिरीत उडी घेऊन शेतमजुराची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन शेतमजुराची आत्महत्या

महेंद्र तायडे हे नेहमीप्रमाणे ३ डिसेंबर रोजी गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळपर्यंत ते परत आले नसल्याने त्यांचा शोध घेण्यात आला; मात्र ते दिसून आले नाही. चार डिसेंबर रोजी सकाळी गावाबाहेरील विहिरीजवळ त्यांच्या चपला व काठी दिसून आली. याबाबत माहिती मिळताच पिंजर येथील दीपक सदाफळे यांच्या आपत्कालीन पथक घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोध मोहीम सुरू केली. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मूर्तिजापूर येथे पाठविण्यात आला आहे. मृत शेतमजुराच्या मागे एक मुलगा, दोन मुली, पत्नी असा बराच मोठा परिवार आहे. माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नागोलकर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. (फोटो)

Web Title: Farmer commits suicide by jumping into a well