शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST2020-12-04T04:52:48+5:302020-12-04T04:52:48+5:30
त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा उंबर्डा बाजारचे एक लाख रुपये कर्ज आहे. त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. ...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा उंबर्डा बाजारचे एक लाख रुपये कर्ज आहे. त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, परंतु त्यांना कर्जमाफी न झाल्यामुळे त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपविली. कर्जमाफी न मिळाल्यामुळे याबाबत त्यांनी अनेकदा बँकेला विचारणासुद्धा केली. परंतु त्यात त्यांचे समाधान न झाल्यामुळे शेवटी कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी तसेच नातवंडे असा आप्तपरिवार आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे करीत आहेत.