कर्जबाजारीपणाला कंटाळून धामणा बु. येथील शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 18:53 IST2017-12-19T18:51:49+5:302017-12-19T18:53:47+5:30

कर्जबाजारीपणाला कंटाळून धामणा बु. येथील शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
ठळक मुद्दे पुरुषोत्तम शेषराव आढे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.पुरूषोत्तम आढे यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. स्थनिक बँकेकडून व एका सावकाराकडून कर्ज घेतले होते.
चोहोट्टाबाजार : नजीकच्या धामणा बु येथील पुरुषोत्तम शेषराव आढे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली आहे.
पुरूषोत्तम आढे यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. स्थनिक बँकेकडून व एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जातून शेतात कपाशीचे पीक घेऊन चांगले उत्पादन झाल्यानंतर हे कर्ज फेडू अशा विचारात असतानाच कपाशीवर बोंडअळीचे संकट आले. त्यामुळे चिंतेत सापडल्याने पुरुषोत्तम आढे यांनी धामना-करतवाडी मार्गावरील एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे.(वार्ताहर)