व्याळा येथे शेतमजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:09 IST2019-09-23T18:09:26+5:302019-09-23T18:09:31+5:30
ज्ञानेश्वर महादेव अहीरकर असे मृतक युवकाचे नाव आहे.

व्याळा येथे शेतमजुराची आत्महत्या
व्याळा(अकोला) : येथील प्लाट भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय शेतमजुराने शेतातील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. ज्ञानेश्वर महादेव अहीरकर असे मृतक युवकाचे नाव आहे.
व्याळा येथील प्लाट भागातील ज्ञानेश्वर महादेव अहीरकर या युवकाने सोमवारी दुपारी खिरपुरी रोडवर नथवाणी यांच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. मृतक ज्ञानेश्वर यांच्या मागे दोन मूल एक मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)