बंदीच्या बेड्यांनंतरही गुटख्याच्या व्यसनाला ‘वेसन’ घालण्यात अपयश!

By Admin | Updated: December 19, 2014 01:47 IST2014-12-19T01:47:08+5:302014-12-19T01:47:08+5:30

लोकमत सर्वेक्षण;गुटखा बंदीचा परिणाम शून्य; बंदीनंतर दर वाढूनही विक्री आलेख कायम.

Failure to put 'Wesson' to gutka addiction even after ban bills! | बंदीच्या बेड्यांनंतरही गुटख्याच्या व्यसनाला ‘वेसन’ घालण्यात अपयश!

बंदीच्या बेड्यांनंतरही गुटख्याच्या व्यसनाला ‘वेसन’ घालण्यात अपयश!

अकोला- राज्यात दीड वर्षांपूर्वी गुटखा विक्रीला बंदी करण्यात आली. विक्रीवर बंदी लादली असली तरी उत्पादनावर कोणतेही बंधने नसल्याने अकोला शहराच्या कानाकोपर्‍यात गुटखा पुडी सहज उपलब्ध होते. बंदीपूर्वी एक पुडी घेऊन गुटखा खाणार्‍या युवकांना आता एका वेळी तीन-तीन पुड्या विकत घ्याव्या लागतात. साहजिकच खिश्यात गुटखा पुड्या असल्याने वाटेल तेव्हा ती फाडून तोंडा टाकण्याची सवयही वाढली आहे. एकूणच बंदीपूर्वी गुटखा खाणार्‍यांची संख्या अधिक असली तरी बंदीनंतर ती कमी होईल, हा शासनाचा उद्देश पूर्ण झालेला नसल्याचे ह्यलोकमतह्णने तरूण आणि प्रौढ वर्गातील निवडक व्यक्तींचा सर्व्हे केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.
गुटा विक्री करणार्‍यांसोबतच तरूण आणि प्रौढ व्यक्तींसोबत गुटखा खाण्याच्या सवयीवर केलेल्या चर्चेतून आणि काही निवड प्रश्नांची उत्तरे नोंदवून काढलेल्या निष्कर्षानुसार गुटखा बंदीपूर्वी जेव्हा खाण्याची तलब आली तेव्हाच पुडी विकत घेऊन खाण्याची सवय असणारे ५0 टक्क्यांपेक्षा अधिक तरूण आणि प्रौढ होते. आता मात्र हेच तरूण दिवसभर पुरेल एवढय़ा गुटखा पुड्या एकाच वेळी विकत घेतात. खिश्यात पुड्या राहत असल्यामुळे कुठेही असो, पुडी विकत घेण्यासाठी जावे लागत नाही. त्यामुळे वाट्टेल तेव्हा ती खाण्याची सवय जडली असल्याचे अनेकांनी सांगितले. दिवसभरासाठी एकाच वेळी पुड्या घेणार्‍यांची संख्या ५५ टक्के आहे. गुटखा खाण्याची आठवण आल्यानंतर पाणटपरीवर जाऊन गुटखा विकत घेणार्‍यांची संख्या २७ टक्के असून मित्रांसोबत किंवा इतर कोणत्याही कारणाने घर किंवा कार्यालयातून बाहेर पडणाल्यानंतर पान टपरीवर जाऊन गुटखा पुडी विकत घेऊन खाणार्‍यांची संख्या १८ टक्के आहे.
गुटखा पुडी विकत घेण्यासाठी कितीही रकम देण्याची तयारी व्यसनाधिन झालेल्यांची असते. याबाबत विचारणा केली असता बंदीनंतर माहगड्या गुटखा पुडी घेण्याची तयारी असल्याचे ६७ टक्के लोकांनी सांगितले. बंदीनंतर गुटखा सहज मिळत नसल्याने पुडीतील गुटख्या ऐवजी तंबाखुमध्ये चोळलेल्या सुपारीचा गुटखा खाणे सुरू केले असल्याचे २२ टक्के लोकांनी सांगितले. ११ टक्के लोकांनी गुटखा खाणे बंद केले असून त्यांनी तंबाखूवर तलब भागविणे सुरू केल आहे. बंदीनंतर गुटखा खाणे बंद करणे किंवा तंबाखुजन्य पदार्थांपासून परावृत्त झालेल्यांची संख्या नगण्य आहे.

Web Title: Failure to put 'Wesson' to gutka addiction even after ban bills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.