शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अकोला जिल्ह्यातील भाजीपाला होणार निर्यात; शेतकरी-निर्यातदार कंपनीत करार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:28 AM

अकोला : दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला आता निर्यात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत निर्यातक्षम भाजीपाला उत्पादक आणि नागपूर येथील ईवा एक्स्पोर्ट कंपनी यांच्यामध्ये सोमवारी भाजीपाला निर्यात करार झाला. करारानुसार जिल्ह्यातील शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला प्रामुख्याने भेंडी, कारले, दूधीभोपळा आणि मिरची निर्यात होणार आहे.

ठळक मुद्देभेंडी, कारले, दुधी भोपळा, मिरचीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला आता निर्यात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत निर्यातक्षम भाजीपाला उत्पादक आणि नागपूर येथील ईवा एक्स्पोर्ट कंपनी यांच्यामध्ये सोमवारी भाजीपाला निर्यात करार झाला. करारानुसार जिल्ह्यातील शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला प्रामुख्याने भेंडी, कारले, दूधीभोपळा आणि मिरची निर्यात होणार आहे. भेंडी निर्यातीच्या दृष्टीने करार संपन्न झाला. ५५ शेतकºयांनी नोंदणी केली असून, साधारणत: ५० एकरात ही निर्यातक्षम भेंडी पिकवणार आहेत. या भेंडीला कंपनीकडून सरासरी २२ रुपये किलोचा दर निश्चित करण्यात आला. जिल्ह्यातून दररोज २५ क्विंटल भेंडी निर्यात होईल. निर्यातक्षम भेंडी पिकवण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार कंपनी तांत्रिक मार्गदर्शन व निविष्ठा पुरविणार आहे. लोकशाही सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर, सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, तहसीलदार रवी काळे, रामेश्वर पुरी, कृषी तज्ज्ञ निवृत्ती पाटील, ईवा कंपनीचे संचालक संदेश धुमाळ, अ‍ॅग्रो स्टारचे अजय क्षीरसागर यांच्यासह उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेतकºयांना मोठी संधी - जिल्हाधिकारीभाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना एक मोठी संधी मिळाली आहे, याचा लाभ घेऊन शेतकºयांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जिल्ह्यातील शेतकरी मागे राहू नये, त्यांचा माल परदेशात निर्यात होऊन त्यांना भरघोस नफा मिळावा, या करिता जिल्हा प्रशासन व अपेडा यांनी शेतकºयांना भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा शेतकºयांनी अवश्य लाभ घ्यावा. भविष्यात आपल्या जिल्ह्यातूनही निर्यातदार तयार व्हावेत, अशी अपेक्षाही यावेळी जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली.

५०० तरुण शेतकºयांना जिल्हा प्रशासन सहकार्य करणार! स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगणाºया जिल्ह्यातील ५०० तरुण शेतकºयांना जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असून, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, उत्तम मार्केट मिळावे व मालाचे ब्रॅण्डिंग व्हावे. तसेच शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाकरिता आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी त्यांना ‘वावर’ नावाच्या उपक्रमाच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याकरिता त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Akolaअकोलाvegetableभाज्या