सावलीही साथ सोडणार, अकोल्यात २३ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव

By Atul.jaiswal | Updated: May 15, 2023 14:37 IST2023-05-15T14:36:47+5:302023-05-15T14:37:25+5:30

आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही.

experience zero shadow on 23rd may in akola | सावलीही साथ सोडणार, अकोल्यात २३ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव

सावलीही साथ सोडणार, अकोल्यात २३ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव

अकोला : सदैव साथ देणारी आपली सावली मंगळवार, २३ मे रोजी मंगळवारी दुपारी १२ वा. १८मिनिटांनी अचानक काही क्षणांसाठी नाहीशी झाल्याचा अनुभव अकोलेकरांना घेता येणार आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातील हे दोन दिवस शून्य सावलीचे असतात. ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोनिय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा असे वर्षातून दोन दिवस शून्य सावली दिनाचे येत असल्याचे खगोल अभ्यासक सांगतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. अकोलेकरांना दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी शून्य सावलीची अनुभूती घेता येणार आहे. उन्हाळ्यात घडणाऱ्या या घटनेला अधिक महत्त्व असुन पावसाळ्यातील घटना गौण मानल्या जाते. आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही.

जिल्ह्यात शून्य सावलीचे चार दिवस

आपल्या जिल्ह्यात या अनोख्या खगोलीय घटनेचा आरंभ दक्षिण भागाकडून उत्तर बाजूस पुढे सरकत जाईल. सोमवार, २२ मे रोजी पातूर, महान, पिंजर या भागातुन होईल. दूसऱ्या दिवशी मंगळवार, २३ मे रोजी अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर,कूरूम या परिसरात, २४ मे रोजी दहिहांडा,चोहोट्टा,अंदूरा,हाता या पूर्णा नदीच्या पट्ट्यात व २५ मे रोजी तेल्हारा,अडगाव, अकोट,सावरा या भागातील लोकांना शून्य सावलीचा अनुभव दूपारी स्थान परत्वे दुपारी १२:१६ ते १२:१९ मिनिटांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना अवश्य घेता येईल.

Web Title: experience zero shadow on 23rd may in akola

टॅग्स :Akolaअकोला