शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात विदेशी मत्स्य प्रजातींचा प्रसार

By admin | Updated: February 13, 2016 01:54 IST

पर्यावरण बदल पथ्यावर: स्थानिक मासेमारांवर उपासमारीची वेळ.

दादाराव गायकवाड/ कारंजा लाड: एकिकडे सततच्या अवर्षणामुळे मासेमारी हा व्यवसाय मोठय़ा संकटात असतानाच, विदर्भात काही विदेशी प्रजातींचा प्रसार वाढला आहे. त्यामुळेच विदर्भासह देशभरातील स्थानिक मत्स्य प्रजाती नष्ट होत असून, त्याचा स्थानिक पर्यावरणावरही वाईट परिणाम होत असल्याचे मत पर्यावरण आणि मत्स्य अभ्यासकांनी मांडले आहे. भारतातील मत्स्य सृष्टीला विदेशी मत्स्य प्रजातींमुळे प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. विदर्भापुरता विचार केला तर आज विदर्भात पाच प्रकारच्या विदेशी मत्स्य प्रजाती पर्यावरणात सोडण्यात आल्या आहेत. त्यात चंदेरा, तिलापिया, सायप्रिनस, आफ्रिकन मागुर, गप्पी यांचा समावेश होतो. विदर्भात आणि इतर ठिकाणीसुद्धा सायप्रिनस नावाचा मासा मत्स्य पालनासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जातो. याच सायप्रिनस मत्स्य प्रजातीने काश्मीर खोर्‍यातील सिजोथोरॅसिनी नावाच्या स्थानिक मत्स्य प्रजातीच्या एका मोठय़ा गटालाच संपवून टाकलं आहे. दुसरी प्रजाती म्हणजे सिल्वर कार्प (चंदेरा) ही प्रजातीसुद्धा आपल्याकडे मत्स्य पालनासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाते. या मत्स्य प्रजातीनेसुद्धा गोविंदसागर आणि अन्य अनेक जलाशयातील कटला या स्थानिक मत्स्य प्रजातीला संपवून टाकले आहे. पर्यावरण तज्ज्ञ तथा मत्स्य अभ्यासक डॉ. नीलेश हेडा यांना २00३ च्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील कठाणी नदीत पूर्व आफ्रिकेतल्या नद्यांमध्ये आढळणारा तिलापिया नावाचा मासा आढळून आला. स्थानिक मत्स्य प्रजातींचा कर्दनकाळ हा मासा असल्याचे त्यांना कळले. १९५२ मध्ये हा मासा भारतात सोडण्यात आला होता. आता याची प्रजाती सगळीकडेच पसरली आहे. हा मासा आपल्या पिलांची काळजी घेतो. आपल्या पिलांना तोंडात ठेवतो. तो इतर माश्यांची अंडी खातो. कोणत्याही परिस्थितीत जगतो. त्यावर रोग येत नाही. त्यामुळे घोगर, जरांग, कडू, पिंजर आणि तंबू या स्थानिक मत्स्य प्रजाती नष्ट होत आहेत.