‘आप’ची विधानसभा निवडणुकीतून एक्झिट
By Admin | Updated: August 21, 2014 00:56 IST2014-08-21T00:56:06+5:302014-08-21T00:56:06+5:30
नेते, कार्यकर्त्यांचा हिरमोड

‘आप’ची विधानसभा निवडणुकीतून एक्झिट
अकोला: सहा महिन्यांपूर्वी देशाच्या राजकारणात हडकंप माजविणार्या आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीनंतर हवा गुल झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारूण पराभवाची पुनरावृत्ती होवू नये, याकरिता राज्यातील विधानसभा निवडणुक न लढविण्याची घोषणा पक्षाने केली आहे. त्यामुळे अनेक स्वप्न उराशी बाळगून ह्यआपह्णमध्ये सामील झालेले नेते व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
दिल्ली विधानसभेत सत्ता प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षाचा दबदबा देशात वाढला होता. काँग्रेस व भाजपासह तिसरा पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत आप पक्षाला गणन्यात येत होते. त्यामुळे चालत्या नावेत बसणारे अनेक नेते व कार्यकर्ते ह्यआपह्णमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे पक्षाचे सदस्य व नेत्यांचे आकडे अचानक फुगले. आपल्यालाही पद मिळेल, उमेदवारी मिळेल,) अशी अनेकांना अपेक्षा होती. तसेच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अन्य पक्षातील मातब्बर नेते पक्षात प्रवेश करतील व जिल्ह्यातील राजकारणात काही वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता होती; मात्र पक्षाने केवळ दिल्लीतच लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरविले असून, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवायची नाही, अशी भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा राज्य कार्यकारिणीची होती. त्याकरिता त्यांनी केंद्र कार्यकारिणीसोबत बैठक घेऊन काही निवडक मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली. ज्या लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवाराला ४0 ते ५0 हजारांच्या वर मते मिळाली, त्या ठिकाणी दोन ते तीन विधानसभा लढविण्याचा विचार आपच्या राज्य कार्यकारिणीतील नेत्यांनी केंद्रीय कार्यकारिणीपुढे मांडला. यातही प्रामुख्याने शहरातील मतदारसंघांचाच समावेश होता. पक्षाच्यावतीने राज्यात सर्व्हेही करण्यात आला होता. त्यानुसार राज्यात ६0 ते ७0 जागांवर उमेदवार लढविण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. केंद्र व राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पक्षात सामील झालेले कार्यकर्ते व नेत्यांचा हिरमोड झाला आहे. अकोला लोकसभा निवडणुकीत अजय हिंगणकर यांना आठ हजारांच्या वर मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट चालल्याने सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला तर भाजपचे उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी झाले. अकोल्यातही भाजपचे संजय धोत्रे दोन लाखांच्यावर मतांनी विजयी झाले.