कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असो.ची कार्यकारिणी गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST2021-07-03T04:13:11+5:302021-07-03T04:13:11+5:30
अकोला- स्थापत्य व निर्माण अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत अकोला, बुलढाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यातील सिव्हिल इंजिनिअर्स वर्गाची संघटना असोसिएशन ...

कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असो.ची कार्यकारिणी गठित
अकोला- स्थापत्य व निर्माण अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत अकोला, बुलढाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यातील सिव्हिल इंजिनिअर्स वर्गाची संघटना
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स अकोला चॅप्टरची कार्यकारिणी गठित करण्यात आली.असो.चे अध्यक्षपदी पंकज कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिव पदाची जबाबदारी प्रा. इस्माईल नजमी यांना देण्यात आली. कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंग अकोला शाखेची आमसभा मावळते अध्यक्ष अजय लोहिया यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. या सभेत गठित झालेल्या कार्यकारिणीत कोषाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर मुखेडकर, कार्यकारी सदस्य अनुराग अग्रवाल,कपिल ठक्कर, रिजवान कुरेशी आदींची यावेळी निवड करण्यात आली. या ऑनलाईन कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश रायपुरे व निर्वाचित राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप शिरखेडकर नागपूर यांनी सभेला मार्गदर्शन केले. यावेळी असो.चे मावळते सचिव अभिजीत परांजपे,कोषाध्यक्ष श्याम साधवानी,कार्यकारी सदस्य संजय भगत आदी उपस्थित होते.
फाेटाे