सगळं अनलॉक, मग पॅसेंजर गाड्या अद्यापही लॉक का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:44 AM2021-08-18T11:44:14+5:302021-08-18T11:47:14+5:30

Why are passenger trains still locked : पॅसेंजर गाड्या मात्र अद्यापही रुळावर धावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Everything unlocked, so why are passenger trains still locked? | सगळं अनलॉक, मग पॅसेंजर गाड्या अद्यापही लॉक का?

सगळं अनलॉक, मग पॅसेंजर गाड्या अद्यापही लॉक का?

Next
ठळक मुद्देसामान्यांना परवडेना विशेष गाड्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची होतेय मागणी

- अतुल जयस्वाल

अकोला : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉक प्रक्रियेंतर्गत सर्वच निर्बंध सैल होऊन, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. रेल्वेची प्रवासी वाहतूकही सुरळीत झाली असून, अकोला स्थानकावरून दररोज तब्बल ११२ एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू आहे. तथापि लेकुरवाळ्या अशी ओळख असलेल्या पॅसेंजर गाड्या मात्र अद्यापही रुळावर धावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात सध्या केवळ विशेष गाड्या धावत असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षण केलेल्यांनाच प्रवास करता येतो. त्यामुळे आरक्षण न मिळालेल्यांची गोची होत आहे. शिवाय आरक्षण तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागत आहे. अशा परिस्थितीत पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी जनसामान्यांमधून होत आहे.

 

बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या

 

भुसावळ-नरखेड

 

वर्धा-भुसावळ

 

नागपूर-भुसावळ

 

अकोला-पूर्णा

 

अकोला-परळी

 

सुरू असलेल्या एक्स्प्रेस गाड्या

 

०२१०५ मुंबई - गोंदिया

०२११ मुंबई - अमरावती

०१०३९ कोल्हापूर - गोंदिया

०२८०९ मुंबई - हावडा

०२१६९ मुंबई - नागपूर

०२७६६ अमरावती - तिरुपती

०२८३३ अहमदाबाद-हावडा

 

अकोला- पूर्णा डेमू झाली सुरू

१९ जुलैपासून सुरू झालेली ०७७७३ ही विशेष डेमू गाडी पूर्णा येथून सकाळी सात वाजता निघून दुपारी १२ वाजता अकोल्यात पोहोचते. त्यानंतर दुपारी चार वाजता ०७७७४ क्रमांकाची ही गाडी पूर्णाकरिता रवाना होते.

 

रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना

सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्यांचे तिकीट सामान्य गाड्यांपेक्षा थोडे जास्तच आहे. एखाद्या वेळी प्रवास करणाऱ्यांना काही फरक पडत नाही. परंतु, दररोज प्रवास करणाऱ्यांना नक्कीच त्याची झळ बसते.

- धनराज पटोकार, प्रवासी

आता सर्वच एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत, तर पॅसेंजर गाड्याही सुरू झाल्या पाहिजेत. सामान्य जनतेला विशेष गाड्यांमध्ये महाग तिकीट व ते देखील ऑनलाइन काढणे परवडत नाही. आणखी किती दिवस पॅसेंजर गाड्या बंद ठेवणार आहेत.

- प्रवीण देसाई, प्रवासी

 

रेल्वे अधिकारी म्हणतात

पॅसेंजर गाड्या कधी सुरू होतील हे सांगता येणार नाही. या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकार आणि रेल्वे मंडळाच्या हातात आहे. तूर्तास तरी विशेष गाड्याच सुरू आहेत.

- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ विभाग

Web Title: Everything unlocked, so why are passenger trains still locked?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.