सर्वांनाच हायटेक प्रचाराची ओढ
By Admin | Updated: August 20, 2014 00:21 IST2014-08-20T00:21:52+5:302014-08-20T00:21:52+5:30
राजकारणाचा सायबर सेल: विधानसभा प्रचारात फेसबुक, व्हॉट्स अँपचा वापर वाढणार

सर्वांनाच हायटेक प्रचाराची ओढ
अकोला: २१ व्या शतकातील माहिती तंत्नज्ञानाचा आविष्कार म्हणजे मोबाईल फोन. अन्न, वस्त्न, निवारा आणि संवाद ही ई-युगाची गरज बनली आहे. मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून विकसित झालेल्या सोशल मीडियामुळे जग अतिशय जवळ आले आहे. संवाद, प्रचार आणि प्रसाराची मोठी जत्नाच या मीडियामध्ये रोज भरते आहे. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्ष, उमेदवार, त्यांचे सर्मथक, कार्यकर्त्यांसह सर्वांनाच हायटेक प्रचाराची ओढ लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने स्वत:चा सायबर सेल स्थापन करून या ई-मीडियाचा जोरदार वापर सुरू केला आहे. फेसबुक, ऑक्यरुट, व्हॉट्स अँप या सोशल मीडियावरून उमेदवारांनी हायटेक प्रचाराची रणधुमाळी निवडणूक कार्यक्रमाआधीच सुरू केली आहे. फेसबुक, व्हॉट्स अँपसह सोशल मीडिया सध्या आघाडीवर आहे. फेसबुक, व्हॉट्स अँपवरून तर दर मिनिटाला अपडेट होणारी राजकीय मंडळी वेगवेगळी छायाचित्ने व डिझाईन अपलोड करीत आहेत. कोणता राजकीय नेता कुठल्या सभेत काय बोलला, हे लगेच समजू लागले आहे. ही हायटेक यंत्रणा राबविण्यासाठी काही राजकीय नेते, पदाधिकार्यांनी स्वत:च्या कार्यालयात तंत्रज्ञांची नियुक्तीही केली आहे. हे तंत्रज्ञ या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाही या हायटेक प्रचार कसा करायचा, याबाबतचे प्रशिक्षण देत आहेत.