राष्ट्रधर्म युवा मंचाची राज्यस्तरावर स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:22 IST2021-02-25T04:22:33+5:302021-02-25T04:22:33+5:30

अकाेला श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने राष्ट्रधर्म युवा मंचाची राज्यस्तरावर स्थापना करण्यात आली आहे. श्रीगुरुदेव सेवाश्रम नांदुरा येथे नुकतीच ...

Establishment of Rashtradharma Yuva Manch at the state level | राष्ट्रधर्म युवा मंचाची राज्यस्तरावर स्थापना

राष्ट्रधर्म युवा मंचाची राज्यस्तरावर स्थापना

अकाेला श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने राष्ट्रधर्म युवा मंचाची राज्यस्तरावर स्थापना करण्यात आली आहे. श्रीगुरुदेव सेवाश्रम नांदुरा येथे नुकतीच राष्ट्रधर्म युवा मंच, केंद्रीय मार्गदर्शन समितीची बैठक मंगळवारी झाली. हा दिवस संस्कार दिन म्हणून आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजींचा वाढदिवस विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला आहे, हे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यस्तरावर राष्ट्रधर्म युवा मंचाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रधर्म युवा मंचच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामेश्वर बरगट यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र तराळे, सचिव मनीष देशमुख, कार्यकारी सदस्य, कार्यकारी सदस्य, अनंत वडोदे, विनोद वेरुळकर, राम देशमुख, मनोज चोबे, कविता येनुरकर, रवींद्र वानखडे आदी, तर मार्गदर्शन समितीमध्ये आचार्य हरिभाऊ वेरुळकर, डॉ. भास्करराव विघे, रामदास चोरोडे, ह.भ. प. नामदेवराव गव्हाळे महाराज, ह.भ.प. काठोळे महाराज यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रसंताच्या तत्त्वप्रणालीनुसार ह्या युवा मंचद्वारे कार्य सामूहिकरीत्या करण्याच्या हेतूने व आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी ज्या इच्छुक युवक व युवतींना सहभागी व्हायचे असेल त्यांनी केंद्रीय समिती सोबत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा युवा मंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र वाङ्मयाचा प्रचार बाल संस्कार शिबिरांचे आयोजन करून, सेवा मंडळ रुजविण्याचा प्रयत्न करेल, ग्रामगीता या युगग्रंथाद्वारे राष्ट्रसंताचे विचार कृतीत उतरविण्याचे संस्कार करण्याचे कार्य या माध्यमातून हाेईल.

आचार्य हरिभाऊ वेरुळकर

Web Title: Establishment of Rashtradharma Yuva Manch at the state level