शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख मार्गांवर जड व मालवाहू वाहतुकीस पुन्हा प्रवेश बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:52 IST

अकोला शहरात गांधी रोड, टिळक रोडवर कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते.

अकोला: शहरातील मध्यभागी असलेली बाजारपेठ आणि खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातही जड व मालवाहू वाहतूक शहरातील प्रमुख मार्गांवरून जात असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीचे नियंत्रण करता यावे आणि जड वाहतुकीला प्रतिबंध घालावा, या दृष्टिकोनातून शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी पुन्हा शहरातील प्रमुख दहा मार्गांवर जड वाहतुकीस तीन महिन्यांसाठी बंदी घातली आहे.अकोला शहरात गांधी रोड, टिळक रोडवर कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते. या रस्त्यांवर जड व मालवाहू वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. या मार्गांवर शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, बँक, धार्मिक स्थळे आणि प्रतिष्ठाने असल्यामुळे मोठी वर्दळ असते. त्यात जड वाहतूकही होत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अपघातसुद्धा घडतात. बाजारपेठेच्या परिसरात सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत ग्राहकांची व व्यापारी वर्गाच्या मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होते. त्यामुळे बाजारपेठेच्या परिसरात सामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी व खरेदी-विक्रीसाठी जाणे-येणेसुद्धा अवघड होते. या मार्गांवरील रहदारी सुरळीत करण्यासाठी ४ नोव्हेंबर २0१९ ते ३ फेब्रुवारी २0२0 या कालावधीत शालिनी टॉकीज ते अकोट स्टॅन्ड, दगडी पूल ते माळीपुरा चौक, अकोट स्टॅन्डकडून सिटी कोतवाली चौकाकडे येणारा मार्ग, अकोट स्टॅन्ड ते अग्रेसन चौकाकडे येणारा मार्ग, अग्रेसन चौक ते बाजारपेठेत जाणारा मार्ग, टॉवर चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, रेल्वे स्टेशन मालधक्का ते रामदासपेठ पोलीस ठाण्याकडून दामले चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, बाळापूर नाक्याकडून शहरात येणारा मार्ग, वाशिम बायपासकडून शहरात येणारा मार्ग, डाबकी रोड रेल्वे फाटकाकडून शहरात येणाºया मार्गावर मालवाहू व जड वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTrafficवाहतूक कोंडी