गणेशोत्सवात करा पर्यावरणाचे संवर्धन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:11 IST2017-08-25T01:11:11+5:302017-08-25T01:11:29+5:30

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्री  गणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्टला मोठय़ा उत्साहात  होणार आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या  आगमनाची खास तयारी केली आहे. यावर्षी बारा दिवस  चालणार्‍या या उत्सवाची सारेच जण मोठय़ा उत्साहाने तयारी कर तात; मात्र हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संवर्धन होणे  गरजेचे आहे.

Enrichment of the Environment at Ganeshotsav! | गणेशोत्सवात करा पर्यावरणाचे संवर्धन!

गणेशोत्सवात करा पर्यावरणाचे संवर्धन!

ठळक मुद्देघरोघरी बसवा इको फ्रेंडली बाप्पासजावटही हवी पर्यावरणपूरक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्री  गणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्टला मोठय़ा उत्साहात  होणार आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या  आगमनाची खास तयारी केली आहे. यावर्षी बारा दिवस  चालणार्‍या या उत्सवाची सारेच जण मोठय़ा उत्साहाने तयारी कर तात; मात्र हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संवर्धन होणे  गरजेचे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविल्या जाणार्‍या  गणेशमूर्तींसाठी रंगही रासायनिकच वापरले जातात. बाप्पांच्या  विसर्जनानंतर विहिरी, तलाव, नद्यांमधील पाणी दूषित होते. ही  गोष्ट लक्षात ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची  गरज आहे. 

गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड
गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांना पर्यावरणाचा विसर पड तो. दरवर्षी हजारो टन प्लास्टर, रासायनिक रंग, निर्माल्य पाण्यात  मिसळून प्रदूषणात भरच पडते. गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची  जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे.  त्याकरिता इको  फ्रेंडली मुर्तींबरोबरच सजावटीकरिताही इको फ्रेंडली आरास तयार  करता येते. या पर्यायाचा वापर करून सण, उत्सव साजरे करताना  होणारा पर्यावरणाचा र्‍हास टाळता येईल.

शाडू मातीच्या गणपतीला मागणी
अलीकडे पर्यावरणाबाबत जनजागृती होत असल्याने घरगुती  गणेशाची स्थापना करताना तो शाडूच्या मातीचाच घेण्याकडे  लोकांचा कल वाढला आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरात पर्यावरण प्रेमी संस्था व संघटनांकडून शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे  प्रशिक्षण देणार्‍या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामुळे  लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती झाली आहे.

सजावटीसाठी कृत्रिम फुलांच्या माळा
सजावटीसाठीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. कृत्रिम  फुलांच्या माळा ६0 रुपयांपासून २00 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

Web Title: Enrichment of the Environment at Ganeshotsav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.