आर्थोपेडिक सोसायटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 13:37 IST2017-06-12T13:37:42+5:302017-06-12T13:37:42+5:30
अकोला आर्थोपेडिक सोसायटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.

आर्थोपेडिक सोसायटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
अकोला : वैद्यकीय व्यवसायात आर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आपण आपल्या कार्यकाळात व्यावसायिक बंधुभावासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अकोला आर्थोपेडिक सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अभिजित लऊळ यांनी दिली. स्थानीय सेंट्रल प्लाझा सभागृहात शनिवारी अकोला आर्थोपेडिक सोसायटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. राज्य आर्थोपेडिक सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य डॉ. शैलेश देशमुख, विदर्भ आर्थोपेडिक सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. महेंद्र काळे, सोसायटीचे अकोला नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अभिजित लऊळ, नूतन सचिव डॉ. इंद्रजित देशमुख, नवनियुक्त कोषाध्यक्ष डॉ. सतीश पडघन, मावळते अध्यक्ष डॉ. रणजित देशमुख, मावळते सचिव डॉ. फिरोज खान आदींच्या उपस्थितीत पदग्रहण अधिकारी डॉ. देशमुख व डॉ. काळे यांनी डॉ. लऊळ व त्यांच्या कार्यकारिणीला पदाची शपथ दिली. यावेळी सोसायटीचे नवीन सदस्य डॉ. नितीन श्यामल, डॉ. अचित मुरारका, डॉ. मेहुल लोहाणा आदींना सदस्यपदाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ डॉक्टर डॉ. के. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालन डॉ. रणजित देशमुख यांनी तर आभार डॉ. फिरोज खान यांनी मानले.