हातरुणच्या आश्रमशाळेने काढली व्यसनांची अंत्ययात्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 17:33 IST2018-08-21T17:30:43+5:302018-08-21T17:33:51+5:30
हातरुण (जि. अकोला ): : व्यसनामुळे आरोग्याची राखरांगोळी होते. विविध आजार आणि रोगांमुळे मृत्यूचा धोका निर्माण होते. आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून हातरुणच्या आश्रमशाळेने व्यसनाची अंत्ययात्रा काढून जनजागृती केली.

हातरुणच्या आश्रमशाळेने काढली व्यसनांची अंत्ययात्रा!
हातरुण (जि. अकोला ): : व्यसनामुळे आरोग्याची राखरांगोळी होते. विविध आजार आणि रोगांमुळे मृत्यूचा धोका निर्माण होते. आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून हातरुणच्या आश्रमशाळेने व्यसनाची अंत्ययात्रा काढून जनजागृती केली.
फ्री वाय-फाय सेवा व डिजिटल क्लासरूम असलेली सामाजिक न्याय विभागाच्या हातरुण येथील स्व. नर्मदाबाई बनारशीलाल अग्रवाल प्राथमिक आश्रमशाळेने व्यसनाची अंत्ययात्रा गावातून काढून बुधवारी जनजागृती केली. त्यावेळी धूम्रपानाच्या दुष्परिणामाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ही अंत्ययात्रा पाहताना ग्रामस्थांमध्ये उत्सुकता दिसून आली. त्यावेळी हातरुण सरपंच संजीदा खातून एजाज खान, माजी सरपंच निलोफर नाज नजाकत खान, माजी सरपंच शे. इजततुल्ला जहागीरदार, माजी सरपंच नंदकिशोर ठाकरे, संस्थेचे संंस्थापक सुभाषचंद्र अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, उपसरपंच अवधूत डोंगरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जाकीर खान, दिलीप सागळे, माजी उपसरपंच शे. युसूफ, सखावततुल्ला जहागीरदार, गजानन नसुर्डे, प्रा. रवी हेलगे, मुख्याध्यापक रविकुमार खेतकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारी ही अंत्ययात्रा गावातून आल्यानंतर आश्रमशाळेत उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतली. त्यावेळी मीनादेवी अग्रवाल, विमल कटारे, सुनंदा जकाते, नजाकत खान, एजाज खान, अकबर खान, मुमताज खान, मुख्तार खान, ज.म. पाठक, माजी उपसरपंच ज्ञानदेव भारसाकळे, ज्ञानदेव गायकवाड, सैयद अली, मुरलीधर माळी, भगवानदास अग्रवाल, इशरत जहागीरदार, प्रमोद रोहणकार, शे. हनिफ, शे. जुबेर, मधुकर मावळे, मुख्याध्यापक नरहरी बोरसे, प्रमोद खाकरे, शालीग्राम माळी, प्रशांत निर्मळ, गणेश सोनोने, दामोदर माळी, अशोक हेलगे, समता सैनिक दलाचे चेतन डोंगरे, मनोज माकोडे, विजय चोरे, संतोष गव्हाळे, दिलीप डोंगरे, योगेश वडतकार, मुकुल तिवारी, पवन गवई, शांताराम रोकडे, संजय सागळे, संतोष सोळंके व वंदना टाले उपस्थित होते. (वार्ताहर)