आकोट फैलातील अतिक्रमित घरे जमीनदोस्त
By Admin | Updated: September 18, 2014 02:26 IST2014-09-18T02:26:48+5:302014-09-18T02:26:48+5:30
अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई.

आकोट फैलातील अतिक्रमित घरे जमीनदोस्त
अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आकोट फैल परिसरातील अशोकनगर, डॉ.आंबेडकर चौक, साधना चौकसह भाजी बाजार परिसरातील अ ितक्रमकांना हुसकावून लावले. तसेच परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून काही अतिक्रमित घरे जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी केली.
आकोट फैल परिसरात काही अतिक्रमकांनी चक्क दुमजली इमारतींचे निर्माण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात रहिवाशांनी मनपाकडे सतत् तक्रारी केल्यावरही कारवाई होत नसल्याचे पाहून तक्रारकर्त्यांनी लोकशाही दिनी तक्रार नोंदवली. त्यानुषंगाने अतिक्रमित दोन घरे पाडण्याची कारवाई करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाच्यावतीने अकोला शहरात अतिक्रमणाच्या विरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमअंतर्गत अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरांवर कारवाई करण्यात आली.