अतिक्रमण निर्मूलन औटघटकेचे!

By Admin | Updated: June 30, 2014 01:52 IST2014-06-30T00:35:40+5:302014-06-30T01:52:43+5:30

‘अतिक्रमणमुक्त अकोला’ मोहिमेला सुरुंग; अनेक ठिकाणांवरील परिस्थिती ‘जैसे थे’

Encroachment eradication of the Atghatke! | अतिक्रमण निर्मूलन औटघटकेचे!

अतिक्रमण निर्मूलन औटघटकेचे!

अजय डांगे / अकोला
महापालिकेने सुरू केलेल्या ह्यअतिक्रमणमुक्त अकोलाह्ण मोहिमेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत असून, याच महिन्यात काढलेले अतिक्रमण पुन्हा ह्यजैसे थेह्ण झाल्याचे रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. काही ठिकाणच्या रस्त्यावरील दुकाने हटविल्यानंतर ती जागा ऑटोरिक्षांनी व्यापली. तसेच पक्के बांधकाम केलेले अ ितक्रमण हटविल्यानंतर त्या ठिकाणी हातगाडी अथवा कच्चे बांधकाम करून दुकान थाटण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी अकोलेकरांकडून होत आहे.
शहरात अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर हातगाड्या आणि ठेल्यांवर दुकाने थाटण्यात आली आहे. गांधी रोडसारख्या मुख्य मार्गावर हातगाड्यांवर दुकाने दुतर्फा थाटण्यात येतात. गांधी रोडवरील वाणिज्य संकुलातील दुकानांचे फलक रस्त्यावर आले आहेत. परिणामस्वरूप वाहतुकीची कोंडी होते. अनेक वेळा तर वाहनाचालकांमध्ये वादही होतात. काही ठिकाणी तर महापालिकेच्या जागेवर पक्के बांधकाम करण्यात आली आहेत. त्यामुळे शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महा पालिका महिन्याभरापासून मोहीम राबवित आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध बांधकाम, दुकानांचे रस्त्यावर आलेले फलक, रस्त्याच्या कडेला ठेला, हा तगाड्यांवर थाटण्यात आलेली दुकाने हटविण्यात येत आहेत. काही ठिकाणी अ ितक्रमण निर्मूलन मोहिमेला दुकानदार सांघिकपणे विरोध करीत आहेत. तसेच काही जण थातूरमातून दस्तावेज दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही करीत आहेत. मनपा कोणत्याही विरोधाला बळी न पडता अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवित आहे; मात्र अनेक ठिकाणी मनपाने काढलेले अतिक्रमण ह्यजैसे थेह्ण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Web Title: Encroachment eradication of the Atghatke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.