नागाच्या दंशाने कर्मचार्‍याचा मृत्यू

By Admin | Updated: June 30, 2014 01:52 IST2014-06-30T01:01:10+5:302014-06-30T01:52:31+5:30

आकोट येथील शासकीय कर्मचार्‍याचा नागाच्या दंशाने मृत्यू.

Employee's death by Naga's sting | नागाच्या दंशाने कर्मचार्‍याचा मृत्यू

नागाच्या दंशाने कर्मचार्‍याचा मृत्यू

अकोला: घरामध्ये लपून बसलेल्या नागाने दंश केल्याने जखमी झालेल्या शासकीय कर्मचार्‍याचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आकोट येथील अवधूत कॉलनीत राहणारे मुरलीधर वामन पागृत (५७) यांच्या घरात नाग घुसला. हा साप लपून बसला होता. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारात मुरलीधर पागृत हे बाथरूमजवळ ब्रश करण्यासाठी गेले असता, नागाने त्यांच्या पायाला दंश केला. सुरुवातीला त्यांना आकोट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना सर्वोपवार रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उ पचारादरम्यान मृत्यू झाला. सर्पदंश झाल्याचे कळताच पागृत कुटुंबीयांनी स र्पमित्राच्या मदतीने घरातील नागाला पकडून प्लास्टिक भरणीत बंद केले. डॉ क्टरांना दाखविण्यासाठी पागृत यांच्या नातेवाइकांनी नागाला सर्वोपचार रुग्णालयात आणले होते.

Web Title: Employee's death by Naga's sting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.