शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थी समिती ठरवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:34 IST

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. 

ठळक मुद्देअधिकारी-कर्मचारी करणार प्राथमिक पडताळणीकुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत  कर्जमाफी दिली जात आहे. त्यामध्ये नियमित परतफेड  करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर  अनुदान, कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकर्‍यांना विशेष  योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी थकबाकीदार शे तकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज विविध संकेतस् थळावर सादर केले. २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार  ४३ शेतकर्‍यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी  १ लाख ३८ हजार ५४३ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन  अर्ज भरले. अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे  चावडी वाचन २७ व २८ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी  तालुकास्तरीय समितीचे अधिकारी-कर्मचारी गावात धाव  घेणार आहेत. त्यावेळी ज्या शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले,  ते लाभासाठी पात्र आहेत की नाही, याची पडताळणी अ ितरिक्त माहिती घेऊन केली जाणार आहे. ती माहिती  आल्यानंतर तालुकास्तरीय समितीचे सचिव तालुका उ पनिबंधक पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करून अपलोड कर तील.

 अर्ज होतील तात्पुरते मंजूर, नामंजूरतालुकास्तरीय समिती प्राप्त अर्जांंपैकी पात्र-अपात्र अर्जापुढे  तात्पुरते मंजूर, तात्पुरते नामंजूर आणि नामंजूर असे शेरे  मारणार आहे. चावडी वाचनातून पुढे आलेल्या माहितीसोबत  बँकेचा तपशिलाचा ताळमेळ घेतल्यानंतर लाभार्थी पात्रतेचा  निर्णय होईल. त्यासाठी तालुकास्तरीय समितीचा निर्णय  महत्त्वाचा ठरणार आहे.

उपविभागीय समितीपुढे आव्हानएखाद्या शेतकर्‍याला तालुकास्तरीय समितीने अपात्र  ठरवल्यास त्यावर त्याला उपविभाग समितीपुढे दाद मागता  येणार आहे. आधी तालुकास्तरीय समितीकडून पूर्ण माहिती  मिळाल्यानंतर समाधान न झाल्यास उपविभाग समितीकडे प्र त्यक्ष लेखी किंवा ऑनलाइन गार्‍हाणे मांडता येणार आहे. 

कुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्रएकाच कुटुंबातील (पती-पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील  अपत्ये या व्याख्येप्रमाणे) व्यक्तींनी एकच अर्ज करणे  आवश्यक आहे. पडताळणीमध्ये अशा कुटुंबाने एकापेक्षा  अधिक अर्ज केले असतील, तर त्यांना योजनेचा लाभ  मिळणार नाही, ही बाब चावडी वाचनातच सांगितली जाणार  आहे. तसेच त्या कुटुंबाला तेथेच अपात्र ठरवले जाणार  आहे.

नोकरदार घाबरले.कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय सेवेत  असलेल्या शेकडो नोकरदारांनीही अर्ज भरल्याची माहिती  आहे. आता गावपातळीवर पडताळणी होत असल्याने इतर  माहिती ग्रामस्थांकडून मिळणार आहे. त्यामुळे नोकरदार  असलेल्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पडताळणीमध्ये  माहिती उघड झाल्यानंतर कारवाई होऊ शकते, अशी भिती  त्यांना आहे. त्यासाठी अनेक केंद्र संचालकांना त्यांनी आ पला अर्ज डिलिट करण्याची विनंतीही केली. मात्र, तसे होत  नसल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. हा प्रकार  मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक केंद्रावर घडल्याची माहिती  आहे. त्या नोकरदारांमध्ये पोलिसांचा समावेश मोठय़ा  प्रमाणात आहे. -