शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

विदर्भात वर्षभरात २९.५९ कोटीच्या वीजचोऱ्यांचाा भंडाफोड

By atul.jaiswal | Updated: April 24, 2018 16:47 IST

अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या.

ठळक मुद्देअकराही जिल्ह्याच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ९३२० वीज जोडण्यांची तपासणी केली. मीटरमध्ये फेरफार अथवा अन्य प्रकारांनी होत असलेल्या १० कोटी ९६ लाख ८० हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरीची २४८२ प्रकरणे उघडकीस. ४८ लाख ३८ हजाराच्या १०७ प्रकरणात वीज वापरातील अनियमितता आढळल्या आहेत.

अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या. त्यापैकी २० कोटी १४ लाख २१ हजार रुपयांची वसुली करण्यात महावितरणला यश मिळाले आहे.महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद साळवे आणि नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी उपसंचालक मंगेश वैद्य यांच्या नेतृत्वात विदभार्तील अकराही जिल्ह्याच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ९३२० वीज जोडण्यांची तपासणी केली. या मोहीमेत भरारी पथकांनी वीज वाहिनीवर थेट आकडा टाकून होत असलेल्या वीजचोरीची ३६८९ प्रकरणे उघडकीस आणली. याशिवाय भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ आणि १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार अथवा अन्य प्रकारांनी होत असलेल्या १० कोटी ९६ लाख ८० हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरीची २४८२ प्रकरणे उघडकीस आणली. यात अकोला मंडलातील २४३, अमरावती २२९, बुलढाणा २००, भंडारा २५१, चंद्रपूर २०५, नागपूर शहर १८७ , नागपूर ग्रामिण १८९, वर्धा २००, यवतमाळ २५०, गोंदीया २१७, गडचिरोली १२४ तर वाशिम मंडलातील १८७ वीजचोºयांचा समावेश आहे.याशिवाय भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ अन्वये ४८ लाख ३८ हजाराच्या १०७ प्रकरणात वीज वापरातील अनियमितता आढळल्या आहेत. यात सर्वाधिक २३ प्रकरणे यवतमाळ मंडलातील तर त्याखालोखाल अमरावती मंडलातील २१ प्रकरणे असून, अकोला ५, बुलढाणा ४, भंडारा १२, चंद्र्रपूर ९, नागपूर शहर ८, नागपूर ग्रामिण, वर्धा आणि गोंदीया मंडलातील प्रत्येकी ७ तर गडचिरोली आणि वाशिम मंडलांतील प्रत्येकी २ प्रकरणांचा समावेश आहे. तर अनियमित वीज वापराची इतर १११५ प्रकरणातून १८ कोटी १३ लाख ६२ हजाराचा अनियमित वीजवापर उघडकीस आणण्यात भरारी पथकाला यश मिळाले आहे. यात अकोला मंडलातील ११५, अमरावती मंडलातील ७१, बुलढाणा ३३, भंडारा ११६, चंद्रपूर १०६, नागपूर शहर १६२, नागपूर ग्रामिण १५०, वर्धा ५८, यवतमाळ ७१, गोंदीया ९७, गडचिरोली ३८ तर वाशिम मंडलातील ९८ प्रकरणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणnagpurनागपूरAkola Zoneअकोला परिमंडळ