शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मीटरची वानवा

By admin | Updated: May 11, 2014 19:11 IST

८० ग्राहकांना हेलपाटे

बोरगाव मंजू : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लालफीतशाहीमुळे बोरगाव मंजू येथील अनेक ग्रामस्थांना वीज पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. बोरगाव मंजू येथील वीज पुरवठा घेऊ इच्छिणार्‍या ८० ग्राहकांना अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही अद्यापपर्यंत विद्युत मीटरअभावी वीज पुरवठा देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे येथील विद्युत कार्यालयात विद्युत मीटर उपलब्ध असतानाही विद्युत कर्मचारी या ग्राहकांना वारंवार विनंती केल्यानंतरही वीज पुरवठा देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बोरगाव मंजू वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे वीज ग्राहकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागत आहेत. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही या ग्राहकांना वीज पुरवठा दिला जात नाही. ग्राहकांना यासाठी वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. येथील वीज वितरण प्रणाली कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन येथील ग्राहकांना तत्काळ नवीन मीटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.


** मुख्यालयी राहण्याच्या नियमाला खो
कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे, या शासनाच्या नियमाला येथील विद्युत कर्मचार्‍यांकडून खो दिला जात असल्याचे चित्र आहे. वीज कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे; परंतु येथील बहुतांश वीज कर्मचारी हे बाहेरगावी राहतात. त्यामुळे रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास, तो पूर्ववत करण्यासाठी अनेक तासांचा वेळ लागतो. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. बोरगाव मंजू परिसरात बुधवारी अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचारी मुख्यालयी नसल्यामुळे तो रात्रभर सुरळीत झाला नाही. त्यामुळे गावकर्‍यांना रात्र अंधारात काढावी लागली.