निवडणुका शांततेत पार पाडा- अमोल गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:58+5:302021-01-13T04:46:58+5:30
माझोड : निवडणुका शांततेत पार पाडा, असे आवाहन पातूर पो. स्टे. चे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांनी केले. १० ...

निवडणुका शांततेत पार पाडा- अमोल गोरे
माझोड : निवडणुका शांततेत पार पाडा, असे आवाहन पातूर पो. स्टे. चे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांनी केले. १० जानेवारी रोजी सायंकाळी माझोड ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सदस्य राजेश ठाकरे होते. यावेळी पो. हे. कॉ. हिंमतराव दिघोळे, पो.कॉ. अनिल भुसारी, पोलीस पाटील शंकर ढोरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पाटील, देवानंद खंडारे, अशोक खंडारे, समाधान पुंडे, गजानन लहुडकार, बाळू खंडारे, संदीप दाभाडे, महेश वाघ, मोहन नेव्हाल, अजय निंबेकर, वैभव पुंडे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक पो. हे. कॉ. हिंमतराव दिघोळे यांनी केले. संचालन व आभार पत्रकार साहेबराव खंडारे यांनी मानले.