तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २६ सप्टेंबरला मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:29 IST2018-08-25T13:29:21+5:302018-08-25T13:29:37+5:30
अकोला : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २६ सप्टेंबरला मतदान!
अकोला : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
आॅक्टोबर २०१८ ते फेबु्रवारी २०१९ या कालावधीत पाच वर्षांची मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच सरपंचांची थेट निवडणुकीद्वारे निवड करण्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आखतवाडा, मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर टाकळी व तेल्हारा तालुक्यातील उमरी या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.