विधान परिषद निवडणूक; तिसरा दिवसही निरंकच!
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:26+5:302015-12-05T09:09:26+5:30
खंडेलवालांसह तिघांनी घेतले १0 अर्ज.

विधान परिषद निवडणूक; तिसरा दिवसही निरंकच!
अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशीही (शुक्रवारी) एकही अर्ज दाखल झाला नसून, भारतीय जनता पक्षाचे वसंत खंडेलवाल यांच्यासह तीन उमेदवारांनी १0 अर्ज घेतले. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वितरण व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू झाली असून, ९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी शुक्रवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवसही कोरा ठरला. शुक्रवारी भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी ४, वाशिम जिल्ह्यातील वाई (गोळे ) येथील अपक्ष अनिल राठोड ३ आणि वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील अपक्ष इप्तेखार अहेमद जब्बार यारखॉ पटेल यांनी ३, असे एकूण १0 उमेदवारी अर्ज घेतले.