२१४ सरपंच, उपसरपंचांची ९, ११ फेब्रुवारीला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:56+5:302021-02-06T04:31:56+5:30
अकोला : सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झालेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवड ९ व ११ फेब्रुवारी रोजी ...

२१४ सरपंच, उपसरपंचांची ९, ११ फेब्रुवारीला निवड
अकोला : सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झालेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवड ९ व ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींची पहिली विशेष सभा घेऊन सरपंच व उपसरपंच पदांची निवड करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील मुदत संपलेल्या २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) आणि सर्वसाधारण, इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये १ फेब्रुवारी रोजी तसेच जिल्ह्यातील महिला सरपंचपदांचे आरक्षण ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले. सरपंचपदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच आणि उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणुका झालेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या ९ व ११ फेब्रुवारी रोजी प्रथम विशेष सभा घेऊन या विशेष सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला. त्यानुसार जिल्ह्यातील २२४ सरपंच व उपसरपंचांची निवड ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये ९ व ११ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
९ फेब्रुवारीला ११६ व ११ फेब्रुवारीला
१०८ ग्रामपंचायतींची सभा
जिल्ह्यात ९ फेब्रुवारी रोजी ११६ ग्रामपंचायतींची आणि ११ फेब्रुवारी रोजी १०८ ग्रामपंचायतींची प्रथम विशेष सभा घेण्यात येणार आहे. या विशेष सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय ‘या’ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची होणार निवड!
तालुका ग्रामपंचायत
तेल्हारा ३२
अकोट ३५
मूर्तिजापूर २७
अकोला ३६
बाळापूर ३५
बार्शीटाकळी २६
पातूर २३
............................................
एकूण २१४
२२४ अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक!
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २२४ अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये नायब तहसीलदार, महसूल मंडल अधिकारी, अव्वल कारकून विस्तार अधिकारी, इत्यादी संवर्गांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.