‘त्या’ गंभीर गुन्ह्यातील १८ पैकी ८ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:14+5:302021-05-24T04:18:14+5:30

दुसऱ्या घटनेतील अटकेतील चार आरोपींना तेल्हारा न्यायाधीशांनी २२ मे रोजी तुरुंगात पाठविण्याचा आदेश दिला. तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ...

Eight out of 18 accused in 'those' serious crimes were arrested | ‘त्या’ गंभीर गुन्ह्यातील १८ पैकी ८ आरोपींना अटक

‘त्या’ गंभीर गुन्ह्यातील १८ पैकी ८ आरोपींना अटक

दुसऱ्या घटनेतील अटकेतील चार आरोपींना तेल्हारा न्यायाधीशांनी २२ मे रोजी तुरुंगात पाठविण्याचा आदेश दिला.

तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम १४३, ५०६, १४७, २९४, ५०४, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(५) मधील गुन्ह्यातील १८ आरोपींपैकी पोलिसांनी शकील शहा, समीर शहा, दानिश शहा, एजाज शहा या आरोपींना अटक केली होती. यापैकी एक आरोपी कोरोनाबाधित असल्याने त्याला उपचारार्थ कोविड क्वारंटाइन केंद्रात तर उर्वरित तीन आरोपींना जिल्हा कारागृहात पाठविण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोट यांनी दिला. पाच आरोपींपैकी सुरेश सिसोदिया, विशाल सिसोदिया, भावेश सिसोदिया, विजय पवार यांना तेल्हारा पोलिसांनी अटक केली होती. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दंगा काबू पथक, पोलीस पथक व गृहरक्षक दलाचे जवान मात्र घटनास्थळी तैनात आहेत.

Web Title: Eight out of 18 accused in 'those' serious crimes were arrested