शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:25 AM

जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काही वर्षांपूर्वी शेती व्यवसाय श्रेष्ठ समजला जात होता. व्यापार मध्यम आणि नोकरी  कनिष्ठ अशी परिस्थिती होती; परंतु आता उलट झाले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. शेतीला  पूरक व्यवस्था उभी झाली नाही. सिंचनाची व्यवस्था झाली नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सा पडला; परंतु आता जिल्हय़ातील सिंचनाच्या प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्षभरामध्ये  शेतकर्‍यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असे सांगत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शे तकर्‍यांनी शेतीसोबतच जोडधंद्यांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले आणि जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सोमवारी दुपारी त्यांनी सदिच्छा भेट  दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत भाजपच्या विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अँड. मो तीसिंह मोहता, भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी,  शरद झांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अँड. मोतीसिंह मोहता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, शिवाजी म्हैसने, डॉ.  गजानन काकड, उज्ज्वल ठाकरे, प्रकाश कळंब, शिवराव राखोंडे, मधुकर सरप, राजू महल्ले,  कैलास शहापूरकर, सुरेश राऊत, श्रीकृष्ण बिल्लेवार, श्रीकृष्ण माळी, नीलेश मरकाडे यांनी  मान्यवरांचे स्वागत केले. 

ज्येष्ठ शेतकर्‍यांना पेन्शन लागू करावी - सिरस्कारबाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी  कार्यक्रमाला सोमवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हिताचा  विचार होणे गरजेचे आहे; परंतु शासन शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी संपला पाहिजे.  या दृष्टिकोनातूत कृषीविषयक धोरणे राबविली जात आहेत. शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या शेतीचा  विकास झाला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे. शासकीय कर्मचार्‍यांना सेवानवृत्तीनंतर  पेन्शन मिळते, तशीच पेन्शन आमच्या ज्येष्ठ शेतकर्‍यांसाठी लागू झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे  गरजेचे आहे, असे मत आमदार बळीराम सिरस्कार यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांचे संघटन मजबूत व्हावे - मसनेधर्मादाय आयुक्त के.व्ही. मसने यांनी बोलताना शेतकरी जाती-धर्मात विभागल्या गेला आहे. यातून  बाहेर पडून शेतकर्‍यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. शेतकर्‍याला स्वावलंबी  बनविण्यासाठी ध्येय-धोरणे राबविण्याची गरज आहे, असे मत मांडले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटील