शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

दुष्काळग्रस्त भागातील ४६९१ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:34 IST

अकोला : फेब्रुवारी व मार्च २0१८ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील ४ हजार ६९१ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होण्याची शक्यता आहे. १२५ शाळांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. ही माहिती शिक्षण विभागावतीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.शासनाने सतत दोन वर्ष ...

ठळक मुद्देशासनाने यंदाही दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले. ४ हजार ६९१ विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती, बँक खाते क्रमांकांची माहिती घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केली आहे. शासनाने परीक्षा शुल्क माफ केले, तर त्यांच्या बँक खात्यात परीक्षा शुल्काची प्रत्येकी ३00 रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

अकोला : फेब्रुवारी व मार्च २0१८ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील ४ हजार ६९१ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होण्याची शक्यता आहे. १२५ शाळांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. ही माहिती शिक्षण विभागावतीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.शासनाने सतत दोन वर्ष जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते; परंतु अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहितीच सादर केली नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदा तसे होऊ नये आणि शासनाने यंदाही दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले, तर या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हे शुल्क तातडीने जमा व्हावे, या दृष्टिकोनातून शाळेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या ४ हजार ६९१ विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती, बँक खाते क्रमांकांची माहिती घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केली आहे. विद्यार्थ्यांची विद्याशाखा, बैठक क्रमांक, नाव, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे गाव, मोबाइल क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, शाखा आणि आयएफसी कोड आदी माहिती पाठविण्यात आली असून, ही माहिती शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील या विद्यार्थ्यांना शासनाने परीक्षा शुल्क माफ केले, तर त्यांच्या बँक खात्यात परीक्षा शुल्काची प्रत्येकी ३00 रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.माफ केलेले शुल्क स्वीकारण्यास अडचणीयंदा अकोला जिल्ह्यात काही ठिकाणीच दुष्काळसदृश परिस्थिती होती. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार की नाही, याविषयी साशंकता आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने माफ केले. विद्यार्थी परीक्षेचे शुल्क भरतात. नंतर शासन हे शुल्क विद्यार्थ्यांना देते. ३00 रुपये शुल्क मिळत असल्यामुळे ७0 टक्के विद्यार्थी शुल्काची रक्कम स्वीकारतच नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नसते आणि झीरो बॅलन्सवर बँका खाते उघडण्यास नकार देतात.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीSchoolशाळा