शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:25 IST

अकोला: बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार एक किमी अंतराची अट न पाळता जेथे इयत्ता पाचवा वर्ग सुरू आहे आणि ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे आठवा वर्ग सुरू आहे, अशा ठिकाणचे वर्ग बंद करण्यात यावे आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल १९ मेपर्यंत पाठविण्यात यावा, असे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाचे उप-संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी सोमवारी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देशिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी नियमबाह्य पाचवी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी केली होती.शेखर भोयर यांच्या दोन वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. इयत्ता पाचवी व आठवीचे नियमबाह्य जोडण्यात आलेले वर्ग बंद करण्यात यावे आणि पुन्हा असे वर्ग जोडण्यात येऊ नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अकोला: बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार एक किमी अंतराची अट न पाळता जेथे इयत्ता पाचवा वर्ग सुरू आहे आणि ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे आठवा वर्ग सुरू आहे, अशा ठिकाणचे वर्ग बंद करण्यात यावे आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल १९ मेपर्यंत पाठविण्यात यावा, असे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाचे उप-संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी सोमवारी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथील शिक्षण उप-संचालक प्राथमिक यांच्याकडे नियमबाह्य पाचवी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी भोयर यांच्या शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हा सचिव मोहन ढोके, उपाध्यक्ष पी. आर.ठाकरे, प्रा. नितीन टाले,अमरावती विभागीय प्रसिद्धीप्रमुख अजयसिंह बिसेन, आशिष बोरकर, आकाश भोयर, सुमित वानखडे आदींनी शिक्षण संचालकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेत, शिक्षण उप-संचालकांनी आदेश दिले. शेखर भोयर यांच्या दोन वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. शासननिर्णय २ जुलै २0१३ नुसार राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गांना मान्यता दिली होती; परंतु त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि एक किमी परिसरात त्याच माध्यमाचा वर्ग उपलब्ध आहे. अशा ठिकाणी पाचवा वर्ग जोडण्यात येऊ नये, तसेच ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे आणि ३ किमी परिसरामध्ये शिक्षणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आठवा वर्ग देण्यात येऊ नये. असे स्पष्ट आदेश शिक्षण उप-संचालक शरद गोसावी यांनी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना सोमवारी दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांच्या अधिपत्याखालील व खासगी व्यवस्थापनेच्या सर्व शाळांचा आढावा घेऊन एक संयुक्त प्रस्ताव शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवून नंतर शिक्षण संचालक शासनाकडे मान्यतेसाठी पाठवतात. इयत्ता पाचवी व आठवीचे नियमबाह्य जोडण्यात आलेले वर्ग बंद करण्यात यावे आणि पुन्हा असे वर्ग जोडण्यात येऊ नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिकSchoolशाळा