शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य तेलाचे भाव वधारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:54 IST

पंधरवड्याच्या आत तेलात ३ रुपयांची वाढ होत ते ८२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशात ओल्या दुष्काळाचे सावट असल्याने तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा परिणाम आता प्रत्यक्ष जाणवत असून, खाद्य तेल प्रतिकिलो मागे ३ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील फोडणी महागली आहे. वधारत असलेले खाद्य तेलाचे भाव जर आटोक्यात ठेवायचे असेल, तर खाद्य तेलापेक्षा भारताने तेलबियांची आयात करावी, अशी सूचनावजा मागणी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट)चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.अतिवृष्टीमुळे यंदा देशांतर्गत सर्वच पिकांची नासाडी झाली असून, सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या तेल उत्पादक राज्यातील स्थिती अत्यंत केविलवाणी आहे. कापूस आणि सोयाबीनचा पेरा दोन्ही राज्यांत जास्त असतो. दोन्ही तेलबियांतून मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची विक्री होते; मात्र दोन्ही राज्य पीछाडीवर पडल्याने आता तेलाचे भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दरम्यान सोयाबीनच्या खाद्य तेलाचे भाव ७९ रुपये प्रतिकिलो होते. पंधरवड्याच्या आत तेलात ३ रुपयांची वाढ होत ते ८२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. ही वाढ पुढच्या तीन ते चार महिन्यांत आणखी दोन ते तीन रुपयांनी वधारण्याचे संकेत मिळत आहेत. तेल उत्पादनात आधीच आपला देश मागे असतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करावी लागते.यंदा त्याहूनही जास्त प्रमाणात आयात करण्याची वेळ येणार आहे, असे चित्र दिसत आहे. त्यावर पर्याय म्हणून ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी यंदा खाद्य तेलाऐवजी तेलबियांची आयात करण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला आहे. तेलबियांच्या आयातीसोबतच तेल निर्मिती करणाऱ्यासाठी काही योजना शासनाने जाहीर कराव्यात आणि आॅइल इंडस्ट्रीजला उभारी द्यावी, असेही डालमिया यांनी सुचविले आहे. त्यावर शासन धोरण काय ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय