शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

बाळापूर नागरी पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार : संस्थाध्यक्ष नातीकोद्दीन खतीब यांच्याविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:37 IST

अकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांविरुद्ध पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केली आहेत.

ठळक मुद्दे१३ संचालकांविरुद्धही आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांविरुद्ध पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केली आहेत. बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविल्याने अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या. गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या ठेवींचा वापर अध्यक्षासह संचालकांनी दुसर्‍या नावाने कर्ज दाखवून स्वत:च केल्याचा आरोप रामदास श्रीराम पराते रा. रंगाहट्टी बाळापूर यांनी अकोला आर्थिक गुन्हे शाखेत दिलेल्या फिर्यादीत केला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करून १६ फेब्रुवारी रोजी अध्यक्षासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी प्रकरण बाळापूर पोलिसांकडे पाठविले होते. त्यावरून बाळापूर पोलिसांनी बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सै. नातीकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब, उपाध्यक्ष श्याम शेगोकार, संचालक माजी नगराध्यक्ष रजीयाबेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमीदोद्दीन सै. जमीरोद्दीन, नंदकिशोर पंचभाई, मो. हनीफ मो. मुनाफ, निजामोद्दीन सफीयोद्दीन, सै. मुजीब सै. हबीब, निर्मला श्रीकृष्ण उमाळे, शे. महेबुब शे. हसन, शे. वजीर शे. इब्राहीम  यांच्याविरुद्ध ४0६, ४0९, ४१८, ४६७, ४६८, ४७१, ५0४, १२0 ब भादंवि आरडब्ब्ल्यू ३, ४ एमपीआयडी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे करीत आहेत. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

ठेवीदारांनी केले होते उपोषण बाळापूर नागरी पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी अनेक ठेवीदारांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. ग्राहक मंचानेही पतसंस्थेविरुद्ध निकाल दिला होता. उपोषणकर्त्या ठेवीदारांना ठेवीतील काही रक्कम देण्याची तयारी पतसंस्थेने दाखविल्यानंतर या उपोषणाची सांगता झाली होती. 

टॅग्स :Balapurबाळापूरbankबँक